जळगाव डिस्ट्रिक्ट असोसिएशन शरीर सौष्ठव खेळाडूंबाबत भेदभाव करीत असल्याचा आरोप निराधार

39

जनसंग्राम वास्तव

जिल्हाध्यक्ष मोहन चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव ;- येथील न्यू स्टार व्यायाम शाळाचे अध्यक्ष यांनी जळगाव डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स असोशिएशन यांच्यावर १२ डिसेंबर रोजी दिलेले निवेदन अथवा आरोप हे निराधार असून असोशिएशन आपल्या कुठल्याही शरीर सौष्ठव खेळाडूंचा भेदभाव करीत नसल्याचा खुलासा अध्यक्ष मोहन चव्हाण यांनी आज १४ रोजी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला . तसेच व्यायाम शाळेच्या लेटर हेडवर संबंधित आरोप करणारी व्यक्ती हि अध्यक्ष आहेत कि सचिव आहे याचाही बोध होत नसून त्यांनी शरीर सौष्ठव स्पर्धेत आपला कुठलाही सहभाग नोंदविला अथवा नियम माहीत नसताना असोशिएशनवर आरोप करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत मोहन चव्हाण यांनी व्यत्क्त केले. तसेच संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक खेळाडू निर्माण केले गेले आहेत . तसेच खोटे आरोप करून स्वताची प्रसिद्धी ,खेळाडूंमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. यावेळी त्यांनी विविध यशस्वी स्पर्धांचे आयोजन जिल्ह्यात केले असून याद्वारे अनेक नामांकित खेळाडू निर्माण झाल्याची आपली भूमिका विशद केली. महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनला याबाबत तक्रार प्राप्त झाली असून यासाठी त्रिसदसिय समिती निर्माण केली असल्याची माहिती सचिव संतोष राम सोहाने यांनी दिली . डिसेंबर आणि जानेवारीत स्पर्धांचे आयोजन जळगाव आणि भुसावळ येथे करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.