अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांची बदली

80

जळगाव ;– सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे . यात आता पर्यंत असंख्य लोकांची प्राण यात गेले आहेत . जळगावव जिल्ह्यातही कोरोनाने थैमान घातलेले आहे . जळगाव जिल्ह्यात हि मृत्यूचे प्रमाण हे अधिक असल्याने जळगाव वैद्यकीय महाविध्यालयाचे डीन डॉ भास्कर खैरे यांच्यावर अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते . त्यांची बदली झाली पाहिजे असेही अनेक वेळा बोलले जात होते . आज जळगाव वैद्यकीय महाविध्यालयाचे डीन डॉ भास्कर खैरे यांची बदली झालेली असून त्यांच्या जागेवर कोल्हापूर मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ मीनाक्षी गजभिये यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे . याबाबत अधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे