राज्य शासनाने ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे – आ. मंगेश चव्हाण

8

चाळीसगाव भाजपतर्फे काळे मास्क लावून निषेध

चाळीसगाव – महाराष्ट्राचा कोरोना बाधितांचा आकडा ४१६४२ वर तर मुंबईचा आकडा २५५०० वर, राज्य सरकारने लॉकडाऊन असेल , हॉस्पिटल मधील सोयसुविेधा असतील याकडे नियोजनबद्ध लक्ष नाही दिल्यामुळे आज संकट अति गंभीर झाले आहे, देशातील ४० टक्के कोरोनाबाधीत मृतक हे महाराष्ट्रात आहे . हा आकडा सुरूवातीच्या काळापासून ३० ते ४० टक्के आहे यावरून परिस्थिती सुधारण्याकडे महाविकासाघाडीचे सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र शासनाने नुकतेच २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले असून आधीच्या १ लाख ७० हजार कोटींच्या पॅकेज मधून जनधन खात्यात सलग 3 महिने ५०० रुपये, 3 महिने उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोफत गॅस, निराधारांना अतिरिक्त मानधन, मध्यमवर्गीयांना ६ महिने कर्जाच्या हफ्त्याच्या जाचातून मुक्तता, सर्वसामान्यांना 3 महिने मोफत तांदूळ अश्या अनेक योजना थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचल्या मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एक रुपयांचीही मदत २ महिन्यात केली नाही, उलट शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेला कापूस व मका खरेदी करत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. हातमजुरी करणाऱ्या कष्टकरी वर्गाला व उद्योग – व्यवसाय – नौकरी बंद असल्याने निराशेच्या गर्तेत असणाऱ्या मध्यमवर्गीयांची हिम्मत खचत चालली आहे. तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गोर-गरिबांचे हाल करणे बंद करावेत, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, असंघटित कामगार, रिक्षाचालक टॅक्सीचालक, छोटे दुकानदार ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे व शेतकऱ्यांच्या घरात व शेतात असलेला पूर्ण कापूस व मका हमीभावाने खरेदी करावा अशी आग्रही मागणी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तोंडाला काळे मास्क व हातात महाविकास आघाडी – ठाकरे सरकारच्या निषेधार्थ घोषणा असलेले फलक घेऊन चाळीसगाव येथील अंत्योदय या पक्ष कार्यालयाच्या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. मेरा आंगण – मेरा रणांगण या पक्षाने दिलेल्या घोषणेनुसार चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी निषेधाचे फलक हातात धरत आंदोलनात सहभाग घेतला. पक्ष कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात झालेल्या या आंदोलन प्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते योगाचार्य वसंतराव चंदात्रे, प्रदेश कार्यकारणी सदस्य उद्धवराव माळी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगराध्यक्षा आशालताताई विश्वास चव्हाण, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, नगरसेवक भास्कर पाटील, संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, अरुण शंकरराव पाटील, तालुका सरचिटणीस गिरीश बराटे, अमोल नानकर, योगेश खंडेलवाल,
,राजेंद्र पगार, बाळासाहेब राऊत,शिक्षक आघाडी अध्यक्ष श्री. विजय कदम सर,वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. रवींद्र मराठे,गावडे,विवेक चौधरी, विकी देशमुख, युवा मोर्चाचे सौरभ पाटील, धीरज पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.