जिल्ह्यातील दारिद्र रेषेखालील खेळाडूंनी ३० मे पर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे माहिती सादर करावी

7

 

जळगाव;– आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अधिकृतपणे (ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील सर्व प्रकारात) ज्या खेळाडूंनी सहभाग घेतलेला असेल व तो खेळाडू हा दारिद्र रेषेखालील (बीपीएल) असेल अशा अत्यंत गरीब खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य शासनाकडून माहिती मागविण्यात आलेली आहे.

तरी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धत सहभाग नोंदविलेल्या दारिद्र रेषेखालील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविल्याचे प्रमाणपत्र, दारिद्र रेषेखालील असल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांकडील दिलेल्या पुराव्यांसह सर्व माहिती 30 मे 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांचे कार्यालयाकडे प्राप्त होईल अशा बेताने पाठवावी, विहित मुदतीनंतर आलेली माहिती शासनाकडे पाठविता येणार नाही याची सर्व संबंधित पात्र खेळाडूंनी नोंद घ्यावी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0257-2237080 यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव मिलींद दिक्षीत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.