पंतप्रधान नरेंद्र मोदींची पश्चिम बंगालमध्ये पाहणी

14

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथील महा चक्रवत अम्फानच्या हाहाकारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दोन्ही राज्यांचा दौरा करणार आहेत. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील कोलकाता विमानतळावर पोहोचले, तेथे राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर पंतप्रधान मोदी अम्फानबाधित भागाचे हवाई सर्वेक्षण करणार. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी गुरुवारी सांगितले की, ‘चक्रीवादळामुळे पीडित लोकांची सर्वोतोपरी मदत केली जाणार आहे’ पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास तीन महिन्यांनंतर दौरा करणार आहेत. उत्तर प्रदेशातील चित्रकूट आणि प्रयागराज येथे पंतप्रधान मोदींनी २९ फेब्रुवारीला भेट दिली होती. कोरोना संकटामुळे तब्बल ८३ दिवसांनी पंतप्रधान पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा दौरा करणार आहेत.