ब्रेकिंग न्यूज : मद्य तस्करी अंगलट ; तीन पोलीस बडतर्फ; एकावर निलंबनाची कारवाई

44

जळगाव : लॉकडाऊनच्या काळात आर.के.वाईन्स अवैध मद्य विक्री प्रकरणात पोलीस कर्मचार्यांसह पोलीस निरिक्षकांचा सहभाग असल्याचे समोर आल्याने यातील तिघान्वर बडतर्फ तर एकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे . तसेच पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या बडतर्फी प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे .
एसआयटीकडून संबंधितांचे फोन, रेकार्डिंग, आर.के.वाईन्सच्या मालकांसह पोलीस कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविण्यात आले. यात थेट सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस निरिक्षकासह संबंधित चार कर्मचार्‍यांना याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले. एसआयटीने चौकशी अहवाल पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव व मनोज सुरवाडे या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ तर भारत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दुजोरा दिला असून पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांना बडतर्फ करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविला असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर.के.वाईन्स प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यांचा तसेच पोलीस निरिक्षकांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर चौकशीसाठी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी नियुक्त करण्यात आले होते. फोन संभाषण, व्हॉटस्अ‍ॅप चाटींग तसेच आर.के.वाईन्स संबधित मालक तसेच पोलीस कर्मचारी यांचे जबाब नोंदविण्यात आले होते.