जिल्हा रुग्णालयात ६ कोरोना संशयित रुग्ण दाखल

64

७ जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी ; ६७ जणांचे अहवाल निगेटिव्ह
जळगाव ;-कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने ६ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले असून आतापर्यंत ७७ जण उपचारासाठी दाखल करण्यात आले होते यातील ६७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून अद्याप ७ जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली .

जिल्ह्यात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ होऊन सर्वच जण सतर्क झाले होते. दिवसंदिवस कोरोना संशयितांची आकडा हा वाढत आहे. दरम्यान दोन दिवसांपुर्वी आढळून आलेल्या रूग्णामुळे जळगावातील मेहरूण परीसर बंदी करण्यात आली आहे. एक रूग्ण आढळून आल्यानंतर शहरातील विविध भागात सामाजिक संस्था, वयक्तिक आणि इतरांकडून जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे. यात तरूण वर्ग हिरारीने भाग घेत आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकुण स्क्रिनिंग आपडीमध्ये एकुण १८९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.