पुण्याहून युपीकडे जाणारे ९६ नागरिक ताब्यात ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

34

जळगाव ;- देशासह राज्यात लॉक डाऊन आणि संचारबंदी असताना अनेकांनी आपल्या घराकडे चोरट्या मार्गाने घरी जाण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडत असून आज ९६ व्यक्तींना पुण्याहून उत्तरप्रदेशात घेऊन जाणारा ट्रक ताब्यात घेण्यात आला असून ९६ जणांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात येऊन त्यांची रवानगी राधाकृष्ण मंगल कार्यालयात करण्यात आलाय आहे. एमआयडीसी पोलिसांनी हि कारवाई केली आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाबंदीचे आदेश आहेत . अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही प्रवेश करण्यासाठी मनाई करण्यात आले आहे. असे असतांना पुण्याहून उत्तरप्रदेश येथे ९६ जणांना घेवून जाणारा ट्रक सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दाखल झाल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी सपोनि संदीप हजारे, पो.कॉ. हेमंद कळसकर, पो.कॉ. योगेश बारी यांना अजिंठा चौफुलीर ट्रक क्रमांक (एमएच ०४ डीके ०४१९) वरील चालक अब्दुल रेहमान रमजान अली चौधरी (वय-४०) रा. पद्मानगर, पोलीस चौकी, भिवंडी ठाणे यांची चौकशी केली असता ९६ जणांना उत्तरप्रदेश येथे घेवून जात असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांना सर्वांना तातडीने खाली उतरवून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात वैद्यकिय तपासणी करून सर्वांना शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.