कोरोनाचा एक रुग्ण ५० हजार लोकांपर्यत हा रोग पसरवू शकतो

35

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. लाखो लोकांना लागण आणि हजारो लोकांचा मृत्यू यामुळे सर्वच हतबल झाले आहेत. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी कोणतीही लस नसल्याने सोशल डिस्टनसिंग हाच एक मार्ग आहे. याचाच उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला केलेल्या संबोधनात केली. देशात लॉकडाऊनची घोषणा करताना मोदींनी सोशल डिस्टनसिंगचे महत्त्वही सांगितले. तज्ज्ञांचे देखील हेच मत असून कोरोनाचा एक जरी रुग्ण मोकळा सुटला तरी तो जवळपास 50 हजार लोकांपर्यंत हा रोग पसरवू शकतो.

लंडनचे इंटेंसिव केयर मेडिसिनचे प्रोफेसर डॉ. ह्यू मॉन्टगोमरी यांच्या मते, कोरोना व्हायरस सर्वाधिक संक्रमित होणारा व्हायरस आहे. या व्हायरसच्या विळख्यात अडकलेला व्यक्ती हजारो लोकांना कवेत घेऊ शकतो. यापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टनसिंग हाच एक उपाय आहे. सामान्य ताप साधारणतः एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे असे जवळपास 14 लोकांना कवेत घेऊ शकतो मात्र, कोरोनाचा संक्रमनाचा आवाका प्रचंड मोठा आहे. याचा आपण अंदाजही बांधू शकत नाही, असेही ते म्हणाले.

कोरोना संक्रमित एका कडून तिघांना, आणि अशा पद्धतीने 10 पटीने वाढत चालतो. जवळपास 59 हजार लोक एकामुळे संक्रमित होऊ शकतो, असे ते म्हणाले. कोरोना कसा वाढते हे पाहूया…

एका रुग्णाकडून 3 जणांकडे, तिघांकडून 9 लोकांना, 9 लोकांकडून 27, 27 लोकांकडून 81, 81 लोकांकडून 243, 243 लोकांकडून 729, 729 लोकांकडून 2187, 2187 लोकांकडून 6561, 6561 लोकांकडून 19683, आणि 19683 लोकांकडून 59049 लोकांना हा रोग होऊ शकतो. मात्र संक्रमित झालेल्या काही लोक आजारी पडतात आणि खूप कमी लोकांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. अनेक रुग्ण बरेही होतात.