जिल्हा रुग्णालयात आणखी दोन कोरोना संशयित रुग्ण दाखल

37

जळगाव– जिल्हा सामान्य रुग्णालयात आतापर्यंत ३३रुग्नांची तपासणी करण्यात आली असून आज आणखी दोन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत .
एक जामनेर तालुक्यातील ३१ वर्षीय तरुण तर दुसरा म्हसावद येथील २५ वर्षीय तरुण अाहे. यातील
जामनेर तालुक्यातील गोद्री येथील एकतीस वर्षीय तरुण पुण्याहून परतलेला आहे. पुण्यात तो कोरोना पॉसिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला होता. गावी परतल्यावर कोरोना सदृश्य लक्षणे जाणवल्याने तो बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. तर दुसरा म्हसावद येथील तरुण हा दिल्ली एअरपोर्टवर कामाला असून तोही गावी परतल्यावर त्याला सर्दी ताप खोकला जाणवल्याने बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. दोघांचे नमुने घेण्यात असुन ते तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.

जिल्हा रुग्णालयात आजपावेतो एकूण ३३ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले. त्यापैकी 28 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेले असून तिघांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ .भास्कर खैरे यांनी दिली. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे