संवेदनशील मनाचे अँक्शन मोडवरील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री लाभले हे राज्याचे सुदैव

93

* विशेष संपादकीय वास्तव : विवेक ठाकरे*
गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात करोनाला अटकाव घालण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी जशी जशी पावले उचलली ते पहाता बडेजाव न मिरवता आपल्यातील आपला कुटुंबप्रमुख वाटावा अशी काळजी ते घेतांनाचे चित्र आहे.उद्धव साहेब कोरानाच्या निमित्त जेव्हा जेव्हा लोकांच्या समोर येत आहेत तेव्हा प्रत्येकवेळी त्यांच्यातील शांत,संयमी व संवेनशीलता प्रामुख्याने टिपण्याजोगी आहे.

मुख्यमंत्री अँक्शन मोडवर राहून सोबत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, त्यांचे सहकारी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे,वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.अमित देशमुख,महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ व साऱ्या फळीला घेऊन जगासह देशावर आलेले हे संकट निस्तारण्यासाठी अतिशय काळजी पूर्वकरित्या कार्यरत असल्याचे राज्य पाहतोय.

देशाच्या १३५ कोटी जनतेपैकी सरासरी ३ टक्के जरी तपासण्या करायची गरज उत्पन्न झाल्यास टेस्टिंग किट आहे कुठे ? याचा सारासार विचार करून केंद्र सरकारने कोरोनाचा धोका ओळखून राष्ट्रीय जैविक विषाणू संस्थेकडून तयारी करायची आवश्यकता असतांना केंद्राचे नियोजन शून्य आहे.त्याऐवजी राज्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे म्हणजे देशभरात प्रथमच पुण्याच्या “माय लॅब” डिस्कव्हरी सोल्युशन या वैद्यकीय संशोधन कंपनीने कोविड-१९ विषाणूच्या निदानाचे किट विकसित केल्याची अत्यंत दिलासादायक बातमी पुढे आली आहे.त्यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग संशयितांच्या तपासणीला वेग येईल व निदान शीघ्र होण्यास मदत होणार आहे.

टीका नाही मात्र आज देशाचे प्रधानमंत्री काशी (वाराणसी) येथून एका Live कार्यक्रमात कोरोनाशी लढतांना दैवावर सारं काही अवलंबून असल्याची भाषा करीत असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र राज्यातील सर्व मेडिकल कॉलेज,खाजगी हॉस्पिटल व उद्योग समूहांच्या इमारती अधिग्रहित करण्याच्या तयारीतून कोरानाच्या मुकाबल्यासाठी सज्जता असल्याचे दाखवून राज्याला दिलासा देत आहेत.

मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळतांना उद्धव ठाकरे यांना कोणत्याच लोकप्रतिनिधी पदाचा अनुभव नाही.पक्ष संघटना व प्रशासकीय काम या वेगवेगळ्या बाबी असल्याने महाराष्ट्र केवळ राजकीय स्पर्धेतून चुकीच्या हाती जात असल्याची टीका त्यावेळी काहींनी केली.
आज अत्यंत कठीण व भयावह परीस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे करीत आहेत.खालच्या पट्टीत अत्यंत शांत-संयमी बोलणं,मुद्देसूद आणि लोकांच्या भावनेला हात घालुन परिस्थितीचे गांभिर्य लक्षात आणून देऊन थेट बोलणं. सतत ‘फॅक्च्यूअल डेटा’ देणं.बोलताना ‘अनावश्यक पाल्हाळ’ आणि ‘डायलाॅगबाजी’ टाळणं.यामुळं महाराष्ट्राची जनता शासन-प्रशासनाची जुळत आहे.
‘लाॅकडाऊन’चा निर्णय योग्य वेळेत मुख्यमंत्र्यांनी घेऊन
राज्यासमोर वास्तव आणून दिले.’टीझर प्रोमो अॅड मार्केटिंग आणि मग पिच्चर’ अशा फिल्मी गोष्टींप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ घालवला नाही हे आपल्या राज्याचे सौभाग्य म्हणावे लागेल.

आजच्या कठीण काळात अनेक दिवसांचा प्रशासनाचा गाळा हाकण्याचा मोठा अनुभव पाठीशी असल्यागत अत्यंत प्रगल्भरित्या सर्व यंत्रणाना सोबत घेऊन धीरोदत्तपणे कोरानाशी लढण्याचं मुख्यमंत्र्यांनी चालवलेलं काम हे भविष्यात महाराष्ट्राचं भाग्य राहील,असा विश्वास बाळगायला हरकत नाही.