तर दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ’-चंद्रशेखर राव

45

नवी दिल्ली – भारतात करोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज संख्या ५६२ झाली आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात बुधवारी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. यानुसार, तेलंगणा सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. लॉकडाऊन दरम्यान नागरिक घराबाहेर पडल्यास त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ, असा कडक इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे.चंद्रशेखर राव म्हणाले कि, अमेरिकेत लॉकडाऊनसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं होतं. जर लोकांनी लॉकडाऊन पाळला नाही आणि जर गरज भासली तर राज्यात संचारबंदी लावण्यात येईल. तसेच हा आदेश न पाळणाऱ्यांना पाहताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्यावे लागतील. अशी परिस्थिती येऊ देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

तसेच काही अडचण असल्यास १०० हा क्रमांक डायल करावा. पोलीस संबंधितांच्या घरी मदतीसाठी येतील. जे लोक परदेशातून परतले आहेत आणि ज्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे, परंतु जे झाले नाहीत, त्यांचे पासपोर्ट जप्त करा, असेही त्यांनी सांगितले.