आमदार शिरीष चौधरी यांचा १८ रोजी जनता दरबार !

40

रावेर:- नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा निपटारा करण्यासाठी आमदार शिरिष चौधरी यांचा मंगळवारी १८ रोजी रावेर तहसिल कार्यालयात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे. १८ रोजी सकाळी ११ वाजता रावेर तहसिल कार्यालयात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारी यातून सोडविण्याचा प्रयत्न आहे.