राजकारणात न येण्याचा अक्षय कुमारचा निर्धार

34

जनसंग्राम वास्तव

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार नेहमी सामाजिक मुद्द्यांवर आपलं परखड मत
मांडत असतो. त्याचे अनेक चित्रपट सामाजिक मुद्द्यांवर आधारलेले आहेत.
त्यामुळे तो लवकरच राजकारणात सक्रिय होईल अशा चर्चा रंगत असतात. परंतु या
सर्व चर्चांना खुद्द अक्षयने पूर्णविराम दिला आहे. आपल्या एका वक्तव्यात
त्याने राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.