बारी समाजाचा जळगाव जामोद येथे राज्यस्तर अतिभव्य मूकमोर्चा

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगाव जामोद जि .बुलढाणा :- वानखेड येथील गतिमंद मुलीवर अत्याचार अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा, पीडित कुटुंबाला 50 लाखाची मदत व खटला चालवण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आदी मागण्यांसाठी शुक्रवारी जळगाव जामोद शहरात बारी समाजातर्फे अतिभव्य विराट मोर्चा करण्यात आला. राज्यभरातून हजारो महिला पुरुष बारी बांधव रस्त्यावर उतरले. अतिशय शिस्तीत मोर्चा जळगाव जामोद च्या उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यातील वानखेड गावातील बारी समाजातील गतिमंद मुलीवर येथील प्रकाश लोणे नावाच्या नराधमाने रॉकेल मागण्याच्या बहाण्याने घरात बसून 8 सप्टेंबरला अत्याचार केला .याबाबत तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक आहे या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरातील बारी समाज बांधव जळगाव जामोद येथे एकवटले.या मोर्चात बुलढाणा जिल्ह्यासह अकोला अमरावती यवतमाळ मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना खानदेशातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या या मूक मोर्चात मूक मोर्चा ने शिस्तीचे प्रदर्शन घडविले.हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यास सोबत उज्वल निकम यांची नियुक्ती करावी व नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी तसेच पीडितेच्या कुटुंबाला सावरण्यासाठी 50 लाखांचे अर्थसहाय्य देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी मार्फत देण्यात आले. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.अखिल भारतीय बारी महासंघातर्फे आयोजित या मोर्चाचे नेतृत्व रमेश घोलप यांनी केले.
बारी समाजाच्या हजारोंच्या मूक मोर्चा ने घडविले शिस्तीचे प्रदर्शन
वानखेड ता. संग्रामपुर येथील गतिमंद मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आज जळगाव जामोद येथे काढण्यात आलेल्या मूकमोर्चा हजारोच्या संख्येने बारी समाज बांधव व भगिनी सहभागी झाले होते पंधरा हजाराच्या वर सहभागी संख्या असतानाही मूक मोर्चा ने अतिशय शिस्तीचे प्रदर्शन घडविले कोणतीही वाहतूक अडविता बारी समाज बांधवांनी एक नवीन आदर्श यानिमित्ताने घालून दिला आहे.
जळगाव जामोद येथील चौबारा चौकापासून या विराट मूक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा मानाजी चौक, चावडी चौक, दुर्गा चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चातील महिला व तरुणींची संख्या लक्षणीय होती महिलांच्या व तरुणीच्या हातात नराधमाला फाशीची शिक्षा द्या हा खटला जलदगती न्यायालयात चालवा, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा,अशा मागण्यांचे फलक होते. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावे , अशीही मागणी यावेळी करण्यात आली. जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले . यावेळी रमेश घोलप यांनी पीडित मुलीला त्वरित न्याय न मिळाल्यास मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला. तसेच सिमाताई डोंबे व इतर मान्यवरांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला.
खालील मुख्य मागण्या
– वानखेडे येथील गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या फाशीची शिक्षा द्या
– पीडित मुलीच्या कुटुंबीयांना 50 लाखाची मदत द्या
– खटला जलदगती न्यायालयात चालवून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा
– अन्यथा बारी समाज शांत बसणार नाही
यावेळी बारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश घोलप शैलेजा घोलप, जळगाव जामोद च्या नगराध्यक्षा सीमा डोंबे, अकोटचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, अंजनगाव सुर्जी चे नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, मनोहर मुरकुटे, निलेश ढगे, गजानन धुळे, जळगाव खानदेश देशोन्नतीचे आवृत्ती संपादक मनोज बारी बारी समाजाचे अध्यक्ष रतन बारी, मंगलाबाई बारी, जि प सदस्य रुपाली काळपांडे, मीनाक्षी हागे ,सूनगावचे सरपंच विजया पाटील, बारी समाज महिला मंडळाच्या डॉ.मंगला काळपांडे, अर्चना घोलप, आशा काळे, आरती केदार, अर्चना मिसाळ द्रोपदाबाई हागे, पार्वता कोथळकर, सविता कपले कलाबाई कपले उपस्थित होते . मोर्चात तुकाराम काळपांडे ,दादाराव काटोले, श्याम डाबरे, सुभाष हागे, नारायण ढगे श्रीकृष्ण केदार, सखाराम काळे, रमेश काळे, अशोक काळपांडे, कैलास बोडके, रमेश बाणाईत, रामा राऊत व सदस्य नंदकिशोर घायल श्रीकृष्ण दातार, गिर्धर ढगे, वसंत धुरडे नारायण दामदर, रमेश डब्बे, मंगेश तेलंगडे, गणेश धांडे, बंडू फुसे, रमेश कोथळकर, अजय वडाळे प्रसन्नजीत पाटील, संगीत भोंगळ, जानराव देशमुख अपर्णा कुटे वामनराव ढगे, वालसांगवीचे किरणराजे कोथळकर, दापोरा चे भागवत बारी, दिलीप वसुले रवींद्र धामणे प्रमोद बारी मनोहर बारी राहुल कळमकर, डॉ. शंकर दलाल, गुणवंत कपले जळगावचे अतुल बारी,भरत बारी,संदीप बारी कैलास बारी एकनाथ बारी, शिवलाल बारी, शिरसोली चे विजय बारी श्रावण ताडे गोरख बारी यांच्यासह हजारो समाज बांधव व भगिनी सहभागी झाले होते.मोर्चाला देशभरातील बारी समाजाच्या विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील समाजाचे विविध संघटना महिला मंडळे बचत गट तसेच बारी समाजातील तरुणांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − nine =