विभागीय आयुक्तंनी घेतला महत्वाकांक्षी योजनांचा आढावा

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगाव :- राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध महत्वाकांक्षी योजनांचा आढावा आज विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी विविध विभागांच्या विभाग प्रमुखांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला.
मुख्यमंत्री देवेंर्द फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्याच्या विकासासाठी काही महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. या योजनांवर गेल्या चार वर्षात झालेला खर्च, भौतिक उद्दिष्टे आणि साध्य, सद्यस्थितीतील प्रगती तसेच पुढील कालावधीत या योजनांची फलनिष्पतीकरीता करावयाच्या उपाययोजनांवर आधारित यशोगाथांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये प्रधानमंत्री गा्रमीण विकास योजना, नगरोत्थान, योजना, जलयुक्त्‍ शिवार अभियान, मुख्यमंत्री पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, दलीतवस्ती सुधार योजना, ठक्करबाप्पा योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, मुद्रा योजना, नाविण्यपूर्ण योजना व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आदिंचा आढावा यावेळी विभागीय आयुक्तांन संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांकडून घेतला.
या बैठकीस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरीक्त मुख्य अधिकारी संजय म्हस्कर, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनिल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी रविंद भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक आर. बी. हिवाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen − thirteen =