मोहाडी गावांतील ग्रामस्थांचा आदर्श इतर गांवकऱ्यांनी घ्यावा – जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगाव :- जामनेर तालुक्यातील मोहाडी गावातील व्यवसाय व शिक्षणानिमित्त बाहेरगांवी गेलेल्या गावकऱ्यांनी गावातील शाळा डिजिटल शाळा व्हावी. यासाठी पाच टि.व्ही संच उपलब्ध करुन देऊन इतर गावातील गावकऱ्यांसाठी नवा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मोहाडी गावातील ग्रामस्थांशी औपचारिक चर्चा करतांना गावातील प्रलंबित प्रश्नही जाणुन घेतले. यावेळी जामनेरचे तहसिलदार नामदेव टिळेकर, मुख्याध्यापक प्रकाश कुमावत, ग्रामस्थ मनोहर पाटील, एस.टी.पाटील, देविदास बागुल, सिताराम साळुंके, मंगेश राजपूत, किरण पाटील, जय प्रकाश पाटील, श्रीमती राजपूत आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर म्हणाले की, मोहाडी गावातील ग्रामस्थांनी आगळावेगळा कार्यक्रम करुन लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. जग 21 व्या शतकाकडे जात असतांना मोहाडी गावांतील शाळा पूर्णपणे डिजीटल व्हावी. जेणेकरून गावातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा विचार करुन गावकऱ्यांनी जबाबदारी स्विकारुन गावातील शाळा पूर्णपणे डिजीटल केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचे अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर पुढे म्हणाले की, मोहाडी गावातील शिक्षकांची जबाबदारी आता वाढली असून शिक्षकांनी गावात चांगले विद्यार्थी व नागरीक घडवावेत अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. ते पुढे म्हणाले की, आजकालचे विद्यार्थी सोशल मिडिया, व्हॉट्सअप, फेसबुक व टिूवटरचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने आजचा विद्यार्थी खूपच स्मार्ट झाले आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा वापर करतांना त्याचा फायदा जास्तीत जास्त शिक्षणासाठी करुन घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी सांगितले.

6 thoughts on “मोहाडी गावांतील ग्रामस्थांचा आदर्श इतर गांवकऱ्यांनी घ्यावा – जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × two =