. तर डिझेल ५० रु. व पेट्रोल ५५ रु. प्रति लिटर मिळणार – गडकरी

छत्तीसगड – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी छत्तीसगड येथील चरोदामध्ये एका सभेला उपस्थित होते. तेथे सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, छत्तीसगडकडे मोठ्या प्रमाणावर जैवीक इंधन निर्माण करण्याची क्षमता आहे. पर्यायी इंधनाचा वापर केल्यामुळे आपण पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून राहणार नाहीत.

गडकरी यांनी छत्तीसगड मधील रस्ते आणि वाहतुकीचे मुख्य प्रश्न सुटावे म्हणून त्या राज्यात आठ मोठी कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी त्यांनी ४,२५१कोटी रुपय लागणार आहेत. यामध्ये रायपूर ते दुर्गच्या परिसरात चारउड्डाणपूल बांधण्याचा देखील प्रस्ताव आहे.

छत्तीसगड मध्ये शेतीतून येणाऱ्या मालाच्या उत्पन्नाची वाढ खूप चांगली आहे. भात, गहू डाळी, आणि उसाचे येथे मुबलक प्रमाणावर उत्पन्न होत आहे. परंतु, हे राज्य जैवीक इंधन उत्पन्नतेचे केंद्र म्हणून देखील उदयास येऊ शकते.
“आपले पेट्रोलियम मंत्रालय हे पाच इथेनॉल प्लांट सुरु करणार आहे. जेथे याचा भाताचा पेंढा, गहुचा पेंढा , ऊस आणि मुन्सिपल वेस्ट यांच्यावर प्रक्रिया करून इंधन निर्माण केले जाईल. ज्यामुळे डिझेल ५० रु प्रति लिटर तर पेट्रोल ५५ रु. प्रति लिटर किमतीने मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 + 4 =