“असंख्य नवऱ्यांना वाटतं शिवसेनेसारखी बायको पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही”

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

मुंबई :- असंख्य नवऱ्यांना वाटत असेल शिवसेनेसारखी बायको पाहिजे. आपली लफडी कळली तरी आपल्याला सोडत नाही, अशी मिश्किल टीका नितेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
आपली लफडी कळल्यावर शिवसेनेसारखी बायको असेल तर जास्तीत जास्त काय? सामनामधून एखादा लेख लिहून येऊ शकतो, पण तुमचा संसार सुरू राहू शकतो; अशी मिश्किल टिप्पणी नितेश राणे यांनी केली आहे.
आपल्या ट्वीटर अकांऊटवरून नितेश राणे यांनी शिवसेनेची चांगलीच खिल्ली उडवली आहे. राणे-शिवसेना वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत आपण स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर करताचं नारायण राणेंवर शिवसेनेनं टीका केली होती. त्याला नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
असंख्य नवरे बोलत असतील..
बायको शिवसेने सारखी पाहिजे!!
लफडी कळली तरी सोडत नाही..
जास्तच जास्त तर काय..एक सामन्यातून अग्रलेख!!
बाकी संसार सुरु!!