दहावी फेल उडवताहेत पाकिस्तानात सरकारी विमानं!

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

लाहोर :- पाकिस्तानमध्ये दहावी नापास असलेले पायलट, सरकारी विमानं उडवत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलायन्सच्या 5 वैमानिकांना या संबंधी अटक करण्यात आलं आहे.
या वैमानिकांनी खोटे प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचं पुढं आलं आहे. डॉन या वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे. एकूणचं हा सगळा प्रकार धक्कादायक मानला जात आहे.
जिथे दहावी नापास व्यक्ती बस चालवू शकत नाही तिथे ही लोकं विमानं उडवत आहेत, असं डॉन या वृत्तपत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, आवश्यक ती शैक्षणिक कागदपत्रे सादर करू न शकल्याने 50 कर्मचाऱ्यांना पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलायन्सने निलंबित केलं आहे.