भीम आर्मीला मोठा धक्का, न्यायालयाने देखील पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

पुणे :- पुण्यात सभा घेण्यास न्यायालयाने परवानगी नाकरल्यामुळे भीम आर्मीला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयानं पोलिसांना याबाबत 4 जानेवरीपर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितली आहे.
भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझादच्या पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एस एस पी एम मैदानावर होणाऱ्या सभा परवानगी न दिल्यानं रद्द झाल्या आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं भीम आर्मीची मुंबईतील सभादेखील रद्द झाली होती.
चंद्रशेखर आझाद यानं काही झालं तरी आपण भीमा कोरेगावच्या विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी जाणार असं, म्हटलं आहे.
दरम्यान, चंद्रशेखर आझाद काल पुण्यात दाखल झाले आहेत. या पार्श्वभीमूमीवर पुण्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत.