भिमाकोरेगाव येथे जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांचा टोलमाफ होणार – रिपाइं

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

पुणे :- भिमाकोरेगाव येथे दि 1 जानेवारी रोजी शौर्यदिनानिमित विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी जनता एकत्र येते.त्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. रिपाइं चे वरिष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे ;घनश्याम चिरणकर ; मीनाताई साळवे; अरुण गायकवाड यांच्या नेतृत्वात रिपाइं च्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन भिमाकोरेगाव येथे जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांना टोलमाफ करण्याची मागणी करण्यात आली.सदर मागणी त्वरीत मंजूर करण्यात आली असून भिमाकोरेगाव येथे जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांवर टोलमाफी देण्यात येणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती घनश्याम चिरणकर यांनी दिली आहे.