भीमाकोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी शौर्यदिनानिमित रिपब्लिकन पक्षातर्फे जाहीर अभिवादन सभा

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

मुंबई : – येत्या दि.1 जानेवारी 2019 रोजी दुपारी 1 वाजता शौर्यदिनानिमित भिमाकोरेगाव येथील पेरणे फाटा येथे रिपब्लिकन पक्षातर्फे जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
भीमाकोरेगाव येथील ऐतिहासिक लढाईत महार वीरांच्या विजयाचे यंदा 201 वे वर्ष आहे. ऐतिहासिक भिमाकोरेगाव युद्धात फक्त 500 महार शूरवीरांनी 25 हजार पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केल्याचे अतुलनिय शौर्य गाजविले होते.महार शूरवीर सैनिकांच्या सन्मानार्थ आणि स्मृतिप्रीत्यर्थ भीमकोरेगाव येथे ब्रिटिशांनी उभारलेल्या शौर्यस्तंभाला दरवर्षी देशभरातील लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी भेट देत असतात. गतवर्षी झालेल्या दंगलसदृश्य प्रकारामुळे यंदा पोलीस प्रशासनाने भीमाकोरेगाव परिसर ताब्यात घेतला आहे.त्यामुळे स्तंभाजवळ जाहीर सभा न घेता येथुन 500 मीटर वर जवळ असणाऱ्या पेरणे फाटा येथे दि.1 जानेवारी 2019 रोजी दुपारी 1 वाजता रिपाइं तर्फे जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच या जाहीर सभेस रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती रिपाइंचे पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी माहिती दिली आहे.