चंद्रशेखर रावण यांची त्वरित सुटका करा- अविनाश महातेकर

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

मुंबई : – भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे प्रमुख ऍड चंद्रशेखर रावण हे चैत्यभूमी येथे जात असताना त्यांना करण्यात आलेली अटक अत्यंत चुकीची असून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर यांनी केली आहे.
येत्या 1 जानेवारीच्या भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येणारी खबरदारी आणि उपाययोजनांना आमचा विरोध नाही. खबरदारी म्हणून पोलिसांकडून होणाऱ्या उपाययोजना योग्य असून भीम आर्मी च्या प्रमुखांना अटक करण्याची कृती चुकीची निषेधार्हच असल्याची रिपब्लिकन पक्षाची भूमिका पक्षप्रवक्ते अविनाश महातेकर यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे.