पोटच्या मुलाला संपवलं, नंतर आत्महत्या करायचं धाडसच होईना!

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

सांगली :- पोटच्या मुलाला संपवून स्वत:ला संपवायला निघालेल्या महिलेनं आत्महत्या करण्याची हिंमत न झाल्याने मरणं टाळल्याचा प्रकार घडला आहे. जत तालुक्यातील आसंगी गावची ही घटना आहे.
महिलेला असाध्य रोगानं ग्रासल होतं. माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलाचे हाल होणार या विचाराने मुलाला संपवून स्वत:ला संपवण्याचा तिने निर्णय घेतला.
पोटच्या मुलाला तिने बादलीत बुडवून मारुन टाकलं. त्यानंतर तिने विहीरीमध्ये उडी घेतली. मात्र, नाका तोंडात पाणी गेल्यास तिची मरण्याची आलेली हिंमत गळून पडली.
तिनं केलेल्या या गुन्ह्याबद्दल तिला शिक्षा होईलच. पण पोटच्या पोराचा जीव घेतल्याची जाणीव तिला आयूष्यभर जगू देणार नाही.