कोरेगाव भीमाला बिनधास्तपणे दर्शनाला यावं; विश्वास नांगरे पाटील यांच आवाहन

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

पुणे :-1 जानेवारीला राज्यातल्या नागरिकांनी कोणतीही भीती मनात न बाळगता कोरेगाव भीमा येथे यावं, असं आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरेगाव भीमा येथे पोलिसांनी सुरक्षेची सर्व तयारी केली असून पार्किंग, ट्रॅफिकच नियोजन करण्यात आलं आहे.
या काळात कोणीही खोटे मेसेज पसरवू नयेत अन्यथा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं देखील विश्वास नांगरे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, कोरेगाव भीमा परिसरात काही तास वीजपुवरवठा बंद राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राव यांनी दिली आहे.