ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती गंभीर

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

मुंबई :- हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार व लेखक कादर खान यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार, कादर खान यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने कादर खान यांना BiPAP व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. कादर खान यांचा मुलगा सरफराज खान आणि त्यांची सून शाहिस्ता खान यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून कादर खान हे मुलगा आणि सूनेसोबत कॅनडात वास्तव्याला आहेत.
डॉक्टरांच्या अंदाजानुसार कादर खान यांना न्युमोनिया झाला असावा. कादर खान यांना पूर्वीपासून Progressive Supranuclear Palsy ही व्याधी आहे. त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असावी, असे डॉक्टरांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी कादर खान यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती.