भाजपला धक्का देत माजी आमदाराची ‘घरवापसी’

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

मुंबई :- भाजपवर नाराज असलेले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे आणि त्यांचे वडील माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी आज राजकीय घरवापसी केली आहे. अपूर्व हिरे आणि प्रशांत हिरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला धक्का दिला आहे. यामुळे नाशिकमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.
अपूर्व हिरे हे भाजपचे नाशिकमधून विधान परिषदेचे आमदार होते. मात्र भाजपच्या कार्यपद्धतीवर ते नाराज होते. म्हणूनच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रसच्या कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. भुजबळ समर्थकांनी काढलेल्या मोर्चालाही अपूर्व हिरे यांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी भाजप त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली होती. ज्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आला.