संभाजी भिडे गुरुजी यांना कोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर 

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

नाशिक :- शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये जून महिन्यात झालेल्या एका सभेत संभाजी भिडे गुरुजी यांनी माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असं विधान केलं होतं. त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी भिडे गुरुजींना जिल्हा सत्र न्यायालयाने हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज ते स्वत: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहिले.