संविधान जागर समिती तर्फे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगांव :- भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने रेल्वेस्टेशन जवळील डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास आमदार राजूमामा भोळे,महापौर सीमा भोळे,माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे,मुकुंद सपकाळे अशपाक पिंजारी, प्रा.सत्यजित साळवे,सरोजिनी लाभणे,रमेश बाऱ्हे, विश्वास बिर्हाडे, भारत सोनवणे,दिलीप सपकाळे,संजय सपकाळे, भारत ससाणे, गंभीर शेख, संदीप ढंढोरे, डॉ. प्रकाश कांबळे, सुभाष सपकाळे, संतोष गायकवाड ,सचिन अडकमोल ,जयसिंग वाघ ,नाना मगरे ,गौताम सपकाळे, आनंदा तायडे, बाबुराव वाघ, माजी नगर सेवक राजूमोरे, विश्वास सपकाळे, निलूबाई इंगळे, इंदुबाई मोरे, प्रा.पवार इ.सह असंख्य सामाजिक व राजकीय संघानान मधील सक्रिय कार्यकर्त्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
डॉ. बाबा साहेबांनीं शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र दिला तेंव्हा भारतीय समाजाने शिक्षणात व उचच शिक्षणात प्रगती करून डॉ,आंबेडकरांसारखे उचच शिक्षित व्हा भारतीय संविधानाने दिलेली संसदीय लोकशाही भक्कम करण्याचा संकल्प या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने करावा हीच खरी डॉ.आंबेडकरांना आदरांजली ठरेल असे मनोगत आमदार राजूमामा भोळे यांनी अभिवादन सभेत केले.
जाती व्यवस्थेचा अंत करून जातिवर्ण विहीन भारत व समाज निर्माण करण्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ठे सध्या करण्यासाठी आणि आंबेडकरांचा स्वप्नातील समाजवादि राष्ट्र घडवण्यासाठी तमाम भारतीय नागरिकांनी कठोर परिश्रम घ्यावे असे प्रतिपादन संविधान जागर समितीचे प्रमुख संयोजक मुकुंद सपकाळे यांनी आदरांजली वाहतांना केले.
या अभिवादन सभेचे प्रास्ताविक हरिशचंद्र सोनवणे यांनी केले या प्रसंगी निवृत्त उपजिल्हाधिकारी प्रीतम तायडे, श्रीकांत बाविस्कर, अनिल सुरडकर, डॉ. चंद्रमणी लाभणे, राजेंद्र गडवे, सचिन अडकमोल, बबलू शिंदे,यशवंत घोडेस्वार,समाधान सोनवणे,वाघमारे साहेब ,मुरलीधर डोळे ,डॉ. जाधव, डॉ रणखांबे, प्रा. वाघ, इत्यादी नागरिकांनी अभिवादन केले .