के.सी.ई. सोसायटीचे अध्यापक विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास आदरांजली

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगाव :- आज दि. ६ डिसेंबर रोजी के.सी.ई. सोसायटीचे अध्यापक विद्यालयात महापरिनिर्वाण दिन अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.आर. राणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष म्हणून डी.एल.एड. विभाग प्रमुख डी .डी .भाटेवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. योगेश भालेराव ,उप-शिक्षक गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्रा.विद्यालय जळगाव हे उपस्थित होते.
प्रसंगी योगेश भालेराव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे देशासाठी असलेले विविध क्षेत्रातील योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सहा डिसेंबर छप्पन साली..या गीताद्वारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
डी.डी.भाटेवाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज निर्मितीसाठी असलेले योगदान व शिल्पकार या विषयी छात्राध्यापकांना मार्गदर्शन केले . छात्रअध्यापक मनीष बागुल याने ‘छाती ठोक सांगू जगाला’ हे गीत सादर केले.कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन अध्यापक विद्यालयाच्या श्रीमती एस.एस.तायडे यांनी केले तर आभार ,प्रा.किसन पावरा यांनी मांडले. प्रा.सौ. एच.टी.चौधरी,प्रा.सौ. एस.व्ही.झोपे ,प्रा.श्रीमती एस.एम.पाटील,डॉ.श्रीमती.डी.एस.पवार,जयश्री तळेले उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.शरद सोनार तसेच प्रथम वर्षाच्या डी.एल.एड छात्राध्यापकांनी आणि वर्ग प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.