गुरुवर्य प.वि.पाटील व ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात महामानवास आदरांजली

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगांव : – के.सी.ई. सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम भुसावळ पंचायत समितीचे शिक्षणविस्तार अधिकारी सुमित्र अहिरे , जळगाव पंचायत समिती चे शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे ,केंद्रप्रमुख शांताराम साळुंखे , शालेय शिक्षण समन्वयक के.जी. फेगडे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यांनतर विद्यार्थ्यांनी उद्द्धरली कोटी कुळे , भीमा तुझ्या जन्मामुळे या गीताने आदरांजली वाहिली.
दामोदर चौधरी , गुणेश पाटील ,आदित्य विसपुते ,ईशा पाटील , तुषार पाटील ,प्रगती मराठे, हेताक्षी बारी , सुजल चौधरी ,प्रथमेश वाघ आदी विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे सुमित्र अहिरे व रविकिरण बिऱ्हाडे यांनी बाबासाहेबांच्या कार्याची ओळख करून दिली.तर उपशिक्षक योगेश भालेराव यांनी पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा.. या गीताने बाबाबासाहेबांची महती गायन केली.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले तर आभार उपशिक्षिका प्रणिता झांबरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षिका कल्पना तायडे , कल्पना तायडे ,दिपाली चौधरी , माधुरी भंगाळे , प्रवीण महाजन , योगेश सुने , सुधीर वाणी आदींनी आदींनी परिश्रम घेतले.
प्रसंगी ए. टी. झांबरे विद्यालयाचे मुख्या.दिलीपकुमार चौधरी , पर्यवेक्षिका उषा नेमाडे , सरला पाटील आदी उपस्थित होते.