अनैतिक संबंधातून 35 वर्षीय ईसमाचा खून

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

पारोळा :- तालुक्यातील मंगरूळ येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून 35 वर्षीय ईसमाचा डोक्यात लाकडी दांडका टाकून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कैलास श्रीकृष्ण पाटील (35) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवराज माधवराव पाटील यांना चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे समजते. खुनाची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक रफिक शेख, पारोळा निरीक्षक विलास सोनवणे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तर सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी मयताच्या घरी तीन संशयीत आरोपींनी येत लाकडी दांडक्याने कैलास पाटील यांच्यावर हल्ला चढवला व डोक्याला मार लागून अतिरक्तस्त्राव होवून त्यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी या खुनासंदर्भात माहिती घेवून तपासाबाबत सूचना केल्या.