महिला लोकशाही दिनी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रलंबित प्रकरणांचा आढावा

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगाव : – दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.
यावेळी महिला पोलिस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नायब तहसिलदार, सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व संरक्षण अधिकारी हे उपस्थित होते.
यावेळी श्री. गाडीलकर यांनी लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जांचा आढावा घेतला. तसेच संबधीत विभागांनी महिला लोकशाही दिनातील तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.