भाजप नेते एकनाथ खडसे यांना हायकोर्टाचा दणका

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी
संभाजीनगर :- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना हायकोर्टाने दणका दिला आहे. खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपिठाने हा निर्णय दिला आहे.
बनावट दस्तावेज तयार करून कट रचणे, दस्तावेज चोरी व फसवणूक प्रकरणी अंजली दमानिया यांच्यासह सहा जणांविरुद्ध खडसे यांच्या तक्रारीनंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकनाथ खडसे यांनी स्वतः हजर राहून फिर्याद दिली होती. या फिर्यादीनंतर अंजली अनिष दमानिया, रोशनी राऊत, सुशांत परशुराम कुऱ्हाडे, सदाशीव व्यंकट सुब्रमनियम, चारमैन फर्नस यांच्याविरुद्ध गु.र.नं. 116 भादवी कलम 379, 380, 420, 465, 466, 467, 468, 469, 471, 474, 120 ब आणि श कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.