….नाहीतर तुम्हाला 3 महिने गाडीच चालवता येणार नाही!

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी
मुंबई :- वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. वाहतुकीचे नियम भंग केल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात येणार आहे.
वाहतूक अप्पर पोलिस महासंचालकांनी याबाबतचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. बेजबाबदार वाहन चालकांना यामुळे चाप बसण्याची शक्यता आहे.
यानुसार सिग्नल न पाळल्यास, वेग मर्यादा ओलांडल्यास, क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहनात भरल्यास किंवा वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात येणार आहे.
दरम्यान, रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत अपघातामधील मृतांचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.