निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान तर्फे गरजू कुटुंबाना मोफत फराळ व कपड़े वाटप

जनसंग्राम न्युज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगाव :- येथील निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान तर्फे उजाड़ कुसुंबा येथील १५० गरजु कुटुंबाना दिवाळी चा फराळ व संकलित केलेले ४२३३ कपडे घरोघरी जावून सौ.वैशाली कुराडे मैडम व विश्वनाथ ज्वेलर्स चे श्री.मनोज पाटिल सर यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले. निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान तर्फे मागील ३ वर्षा पासून हां दिवाळी चा उपक्रम गरीब आणि गरजू कुटुंबासाठी प्रतिष्ठान चे सदयस्य घरोघरी जावून आपल्यासाठी जुने पण गरजू साठी नविन असे चांगल्या प्रमाणातील कपडे घरोघरी जावून कपड़े संकलित करुण उजाड़ कुसुंबातील गरीब आणि गरजू लोकांना दिवाळी निमित वाटप करुण त्यांची ही दिवाळी आनंदाने साजरी करतात. या समाजसेवी उपक्रमासाठी दिनेश बाविस्कर, रज्जाक काजी, संजय पांडे, विजय पाटिल, सचिन नकवाल, डॉ.राकेश झोपे, वैशाली जाधव आदिनी मदत केली. तसेच उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष-अविनाश जावळे, सचिव-सौ.शारदा सोनवणे, निशा पवार, धीरज जावळे, धनंजय सोनवणे, शकील अहमद, महेश शिंपी, राकेश मूंडले, रोशन मुंडले, मीना परदेशी ,चैतन्य पवार, यासीन तडवी आदिनी परिश्रम घेतले.