फळपिक विमा योजनेसाठी 42.55 कोटी रुपये अनुदानास राज्य शासनाची मान्यता

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगाव :- पूनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना 2017-18 मध्ये अंबिया बहाराकरिता राबविण्यात आली आहे. शेतक-यांचा फळपिकांना हवामान धोक्यापासून संरक्षण दिल्यास शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राखण्यास मदत व्हावी यासाठी जळगाव जिल्हयातील महसुल मंडळ घटक धरुन द्राक्षे, मोसंबी, डाळींब, पेरु, केळी, आंबा व लिंबू या फळपिकांसाठी ही योजना राबविण्यात आली. रुपये 53.27 कोटी पैकी पूर्नरचित व हवामानावर आधारित फळपिक योजना 2017-18 मध्ये अंबिया बहराकरिता नियमित व गारपिट या हवामान धोक्याची राज्य शासनाच्या हिस्साची रक्कम जळगाव जिल्हयासाठी रुपये 42.55 कोटी रक्कमेचे अनुदान उपलब्ध करुन देणेसाठी एचडीएफसी जनरल इन्शुरंन्स कंपनीस शासनाने मान्यता दिली असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सभांजी पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.