नाशिकमध्ये दिवाळी साजरी करणार इरफान खान

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

नाशिक :- लवकरच अभिनेता इरफान खान भारतात परतणार असून तो नाशिकमध्ये यंदाची दिवाळी साजरी करणार आहे. न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हा दुर्धर आजार इरफानला झाला असून त्याच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. इरफान मार्च महिन्यापासून लंडनमध्येच असून तो दिवाळीसाठी दहा दिवस भारतात येणार आहे.
इरफान नाशिक येथील फार्महाऊसमध्ये कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. तो दहा दिवसांनंतर पुन्हा लंडनला रवाना होणार आहे. ‘हिंदी मिडियम’ या चित्रपटाच्या सिक्वलच्या शूटिंगला इरफान सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात होते. पण डॉक्टरांकडून शूटिंगसाठी पूर्ण वेळ देण्याला अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही. तो पुढच्या वर्षी मार्चपर्यंत पहिल्यासारखे नियमित काम करू शकणार असल्याचे वृत्त आहे.