मेनका गांधींच्या भावना मी समजू शकतो- मुख्यमंत्री

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

मुंबई :- यवतमाळमधील टी वन वाघिणीचा मृत्यूवरून सरकारला दोषी ठरवलं जात आहे. त्यावर आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी सरकराची पाठराखण केली आहे.
आधी वाघिणीला बेशुद्ध करून पकडावे आणि नंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम आहे. मात्र, त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती, हे देखील ध्यानात घेणे गरजेचे आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
वाघिणीने हल्ला केल्यामुळे नाईलाजाने तिच्यावर गोळी झाडावी लागली. सध्या आम्ही याप्रकरणाची चौकशी करत आहोत. तिला ठार मारताना नियमाचे उल्लंघन झाले का, हे तपासले जाईल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मेनका गांधी यांनी तीव्र शब्दात टीका केली. मात्र त्या प्राणीप्रेमी आहेत. त्यांच्या भावना मी समजू शकतो, असंही फडणवीसांनी म्हटलं.