राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून भाजपला फटकारले

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून भाजपाला फटकारले आहे. गेल्या साडेचार वर्षात भारतावर खूपच अत्याचार झालेत. लोकसभा निवडणुकीनंतरच शुद्धीवर येईल, असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
काय आहे राज ठाकरेंचे व्यंगचित्र?
धनत्रयोदशीचा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो. वैद्यकीय शास्त्राचा देव ‘धन्वंतरी’ यांचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्वाचा मानतात, असे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात म्हंटले आहे. या व्यंगचित्रामध्ये आयसीयूत भारताला दाखविले आहे व आयसीयूबाहेर धन्वंतरीचे चित्र रेखाटले असून काळजीचे कारण नाही. गेल्या साडेचार वर्षात त्यांच्यावर खूपच अत्याचार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर शुद्धीवर येईल, असे धन्वंतरी आयसीयू बाहेर जमलेल्या लोकांना उद्देशून म्हणत आहेत.