आर्यन इंटरनेशनल स्कूल च्या वतीने ८३ गरजू कुटुंबाना मोफत कपड़े वाटप

जनसंग्राम न्यूज नेटवर्क /प्रतिनिधी

जळगांव :- येथील पाळधी आर्यन इंटरनेशनल स्कूल तर्फे दिवाळी निमित्त ८३ गोर-गरीब कुटुंबाना कपडे वाटप च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी आर्यन शाळेतील विद्यार्थ्यानी आपल्या घरातील आपल्या साठी अनावश्यक परंतु गरजू आणि गरीबांसाठी आवश्यक असेल असे चांगल्या प्रमाणातील तब्बल ५८८ कपडे जमा केले आणि आज रोजी संस्थेचे चेयरमैन डॉ.केदार जी थेपड़े सर यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी पाळधी व फुलपाट येथील ८३ गरीब आणि गरजू कुटुंबाना विद्यार्थ्यानी आपल्या हस्ते वाटप करुण समाजासमोर एक आदर्श उभा करुण आपली दिवाळी गरीब-गरजू लोकांची गरजा पूर्ण करुण साजरी केली यावेळी आर्यन शाळेच्या शिक्षकांच्या वतीने गरीब कुटुंबातील लहान लहान चिमुकल्याना दिवाळीचा फराळ आणि खाऊ वाटप करण्यात आले यावेळी आर्यन इंटरनेशनल स्कूल चे मुख्यध्यापिका सौ.रोजमेरी जोसेफ , उपमुखध्यापक- अविनाश जावळे सर, महेश पाटिल सर, आतिफ शेख,रुबीना मुजावर,शबनम पठाण,लिनेट वेगस,दीपाली बारी,गौरी पाटिल,भावना कोळी,रवीना पाटिल,संगीत बाहेती,अफ़साना शेख,प्रतिभा सोनवणे,रत्ना सपकाले,वैष्णवी पाटिल, आदि उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीनी सहकार्य केले .