भडगाव दुय्यम कारागृहातील कैद्यांना अन्न व पाणी पुरविणेबाबत

जनसंग्राम न्यूज नेटवर्क /प्रतिनिधी

जळगाव : – भडगाव दुय्यम कारागृहातील वर्ग-2 कैद्यांना दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीसाठी शिजवून तयार केलेले अन्न तसेच पिण्यासाठी व स्नानासाठी दिवसातून कमीत कमी दोन वेळा पाणी पुरविण्याचा मक्ता द्यावयाचा आहे.
याकरीता सीलबंद निविदा मागविण्यात येत असून या निविदा 5 डिसेंबर 2018 पावेतो सुट्टीचे दिवस सोडून तहसील कार्यालय, भडगाव येथे पोहोचतील अशारितीने टपालाने अथवा समक्ष सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या निविदांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी अधिक्षक, दुय्यम कारागृह, भडगाव यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिक्षकांनी केले आहे.