ट्रॉली उलटल्याने दोन जण गंभीर

यावल- शहरातील सातोद रस्त्यावरील जिल्हा परीषद शाळेजवळ केळी घेऊन येणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने यात दोन जण गंभीर जखमी तर इतर तीन जण जखमी झाल्याची घडली . जखमींना उपचारार्थ जळगावला हलविण्यात आले . येथील सातोद रस्त्यावरून टॅ्रक्टर (क्रमांक एम.एच.19 सी. यु. 1192) जात होते. ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीत कापणी झालेली केळी व मजूर बसले होते. बाजार समितीकडे जाणार्‍या या ट्रॅक्टरची ट्रॉली सातोद रस्त्यावरील जिल्हा परीषद शाळेजवळ अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. त्यात नबी हुसेन खाटीक (55), वामन हिवराळे (52), मनोज नारायण साबळे (30), अल्लारख्खा शेख शब्बीर (25) व विनोद मगन गजरे (33) हे पाच जण जखमी झाले. अपघात झाल्याची माहिती मिळता घटनास्थळी अजहर खाटीक, नासीर खान, विशाल गजरे आदींनी धाव घेत जखमींना तात्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉ. परविन तडवी, डॉ.उमेश कवडीवाले, सरला परदेशी, चंद्रकांत ढोके यांनी जखमींवर प्रथमोपचार करून रुग्णवाहिकेमधून त्यातील गंभीर जखमी झालेले नबी खाटीक व वामन हिवराळे यांना जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले.