मनसेचे नेते आंदोलन करायला गेले आणि आपापसातच भिडले!

जनसंग्राम न्युज नेटवर्क / प्रतिनिधी
मुंबई :- मनसेच्या आंदोलनात मनसे नेत्यांमध्ये जुंपल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात हा प्रकार घडला.
मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी महापालिकेच्या एल विभागीय कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं. मनसेच्या प्रमुख नेत्यांसह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
याच कार्यालयातील कंत्राटदाराला मारहाण केल्यामुळे तुर्डेना तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यामुळे मनसेने विविध प्रश्नांसाठी हा मोर्चा काढला होता.
अधिकाऱ्यांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी आवाज वाढवला. बाळा नांदगावकर यांनी त्यांना गप्प केलं. नांदगावकर यांच्या हस्तक्षेपामुळे संदीप देशपांडे चिडले आणि काही आंदोलनकर्त्यांसह ते निघून गेले.