दिवाळीनंतर पुन्हा एकदा ‘एक मराठा लाख मराठा’

जनसंग्राम न्युज नेटवर्क / प्रतिनिधी
मुंबई :- मुंबईत पुन्हा मराठा मोर्चाचे वादळ दिवाळीनंतर धडकणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीने केली आहे. राज्यातील गावागावातून दिवाळीनंतर ‘मराठा संवाद यात्रा’ निघणार आहे.
१६ ते २६ नोव्हेंबर दरम्यान ‘मराठा संवाद यात्रा’ होणार आहे. राज्यभरातील ‘मराठा संवाद यात्रा’ २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुण वाद पेटण्याची शक्यता आहे.
मराठा अथवा मराठा क्रांती मोर्चा नावाने राजकीय पक्ष स्थापन करणाऱ्यांना समाज धडा शिकवणार आहे, मराठा क्रांती मोर्चा नावाचा कोणताही पक्ष स्थापन करून देणार नाही. सरकार ‘फोडा व झोडा’ नितीचे राजकारण करत आहे. मराठा समाज या राजकारणाला बळी पडणार नसल्याचे मत मराठा कोअर कमिटीने व्यक्त केले.

Wordpress fireworks powered by nkfireworks