हिंमत असेल तर राम मंदिराचा अध्यादेश काढून दाखवाच- असदुद्दीन ओवेसी

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

नवी दिल्ली :- जर भाजप आणि संघ परिवारात हिंमत असेल तर त्यांनी खरोखर राम मंदिरासाठी अध्यादेश आणून दाखवावाच. मग बघाच काय होतं, असं आव्हान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी दिलं आहे.
राम जन्मभूमी खटल्यावर आज सर्वौच्च न्यायालयात सुनावणी झाली. ही सुनावणी जानेवारी २०१९ पर्यंत पुढे ढकलली आहे. तसंच त्यासाठी एका योग्य खंडपीठाची नियुक्तीही केली जाईल अशी घोषणाही करण्यात आली.
रामजन्मभूमीच्या खटल्यावर सुनावणी जानेवारीत घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं ओवेसींनी स्वागतही केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची 56 इंचांची छाती असेल तर त्यांनी अध्यादेश आणावाच. फक्त अध्यादेशाची भलावण किती दिवस करणार? असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थितीही केला.