आदिवासी कुटुंबाच्या मांडीला मांडी लावून राज ठाकरेंनी घेतला जेवणाचा आस्वाद!

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

अमरावती :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. मैत्री संस्थेच्या विविध प्रकल्पांना भेट दिल्यावर दुपारी रुईपठार ह्या गावी सेलूकर कुटुंबियांच्या घरी राज ठाकरेंनी जेवण केलं. त्यांनी या कुटुंबियांच्या मांडीला मांडी लावून जेवणावर ताव मारला. त्यामुळे त्यांच्या या साधेपणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सेलूकर कुटुंबातील महिलांनी मक्याची भाकर, राजगिरा पाल्याची भाजी, मसूर आमटी, कुठकी म्हणजे स्थानिक लाल भात आणि गोली या गोड्या पाण्यातील माशाचे कालवण असा जेवणाचा बेत आखला होता.
दरम्यान, हे आदिवासी पाडे खूप दुर्गम आहेत म्हणण्यापेक्षा ते दुर्गम राहिलेत असं म्हणेन. आणि अर्थातच विकासापासून देखील वंचित राहिलेत. इथल्या लोकांना प्रवाहात आणण्याचं जे काम मैत्री संस्थेचे स्वयंसेवक करत आहेत त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन, असं ट्विट राज ठाकरेंनी केलं आहे.